मुंबई- राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दाक्षिणात्य कलाकार किर्ती सुरेश तिच्या आगामी पेंग्विन चित्रपटात एका असहाय्य आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पेंग्विनच्या माध्यमातून कार्तिक दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा एक रहस्यमय थ्रिलर सिनेमा असणार आहे.
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा 'पेंग्विन'चा रहस्यमय टीझर प्रदर्शित - किर्ती सुरेशचा आगामी सिनेमा
आज प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये एक सुंदर लग्न पाहायला मिळते. सोबतच खार्तिक फालानी यांची सिनेमेटोग्राफी थ्रिलर अनुभव देऊन जाते.
स्टोन बेंच फिल्म्स आणि कार्तिक सुब्बाराज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये एक सुंदर लग्न पाहायला मिळते. सोबतच खार्तिक फालानी यांची सिनेमेटोग्राफी थ्रिलर अनुभव देऊन जाते.
अभिनयाविषयी बोलायचं झाल्यास, किर्तीने एका तरुण आईची भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. एक आई आणि मुलगा गायब झाल्यानंतर त्याची शोधात निघालेली एक कठोर महिला, अशा दोन बाजू तिच्या पात्रात पाहायला मिळतात. सिनेमाचा टीझर ट्रेलरविषयीची उत्कंठा वाढवणारा असून ट्रेलर 11 जूनला प्रदर्शित होणार आहे. पेंग्विन सिनेमा 19 जूनला अमॅझोन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.