महाराष्ट्र

maharashtra

जेव्हा सेटवरच पहलवान अन् सुलतानमध्ये जुंपते, सुदीपनं शेअर केली पोस्ट

या फोटोत सलमान आणि सुदीप एकमेकांसोबत कुस्ती खेळण्याच्या पोजमध्ये दिसत आहेत. सुदीपनं हा फोटो शेअर करत म्हटलं, हे चित्रपटाचं नवं पोस्टर नाहीये...हा फोटो फक्त हे दाखवतो, की सलमान एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत कशी मस्ती करतो.

By

Published : Aug 24, 2019, 6:14 PM IST

Published : Aug 24, 2019, 6:14 PM IST

जेव्हा सेटवरच पहलवान अन् सुलतानमध्ये जुंपते

मुंबई- दाक्षिणात्य अभिनेता के सुदीप लवकरच पहलवान चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाशिवाय तो सलमानच्या दबंग ३ चित्रपटातही झळकणार असून सुदीपनं सलमानसोबतचा आपला एक खास फोटो शेअर केला आहे.

या फोटोत सलमान आणि सुदीप एकमेकांसोबत कुस्ती खेळण्याच्या पोजमध्ये दिसत आहेत. सुदीपनं हा फोटो शेअर करत म्हटलं, हे चित्रपटाचं नवं पोस्टर नाहीये...हा फोटो फक्त हे दाखवतो, की सलमान एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत कशी मस्ती करतो. धन्यवाद सलमान सर, तुमच्या आयुष्यात मला दिलेल्या या जागेबद्दल.

दरम्यान पहलवान चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश्ना यांनी केले आहे. हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषेत हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर सलमाननंही सुलतान चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. यात त्याच्यासोबत अनुष्का शर्मादेखील झळकली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details