मुंबई- अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि पती निक जॉनस काही ना काही कारणाने सतत चर्चेत असतात. या जोडीच्या फोटोंची चाहते अतुरतेने वाट पाहात असतात. अशात नुकतंच एका मुलाखतीत प्रियांकाने आपल्या नात्याविषयीच्या काही गोष्टी सांगितल्या. तिने सांगितले की निक खूप रोमँटीक आहे.
प्रियांकाने शेअर केली निकची झोपेतून उठल्यानंतरची सवय, म्हणाली.... - प्रियांका चोप्राने सांगितली निकची सवय
प्रियांकानं नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं, की हे खरोखर त्रासदायक आहे, मात्र, जेव्हा मी झोपेतून उठते तेव्हा निक माझा चेहरा पाहण्याचा आग्रह धरतो. मी त्याला म्हणते, फक्त एक मिनीट थांब. मला मस्करा लाऊ दे, मेकअप करु दे.
प्रियांकानं नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं, की हे खरोखर त्रासदायक आहे, मात्र, जेव्हा मी झोपेतून उठते तेव्हा निक माझा चेहरा पाहण्याचा आग्रह धरतो. मी त्याला म्हणते, फक्त एक मिनीट थांब. मला मस्करा लाऊ दे, मेकअप करु दे. कारण, माझा चेहरा झोपेतून उठल्याप्रमाणे दिसत आहे. मात्र, तो एवढंच म्हणतो, हा चेहरा खूप सुंदर आणि गोड आहे. तो एकटक माझ्याकडे पाहात राहातो.
निक आणि प्रियांकाने डिसेंबर 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. कामाबद्दल बोलायचं झाल्यास अभिनेत्री लवकरच 'व्हाईट टायगर' या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत राजकुमार रावही असणार आहे. अरविंद अडीगाच्या 'व्हाईट टायगर' नावाच्या मॅन बुकर पुरस्कारप्राप्त कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे