महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियंका चोप्राने जुने फोटो शेअर करुन दाखवली ''अनफिनिश्ड'' आठवण - प्रियंका चोप्राचे आत्मचरित्र

अभिनेत्री प्रियांका चोप्राने बुधवारी तिच्या बहुप्रतिक्षित अनफिनिश्ड बायोपिकची झलक असलेले काही फोटो क्लिप्स शेअर केल्या आहे. आठवणींचा मागोवा घेणारे हे पुस्तक लवकरच वाचकांचा हाती येईल.

PeeCee
प्रियंका चोप्रा जोनास

By

Published : Sep 30, 2020, 2:17 PM IST

मुंबई - अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास अलिकडे तिच्या अनफिनिश्ड पुस्तकामुळे चर्चेत आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ क्लिप शेअर केल्या आहेत. तिच्या बायोपिकची झलक यातून पाहायला मिळू शकते.

इन्स्टाग्रामवर तिने तीन क्लिप शेअर केल्या आहेत. याच्या कॅप्शनमध्ये तिने फक्त अनफिनिश्ड इतकेच लिहिले आहे. पहिल्या क्लिपमध्ये ती मिस वर्ल्ड 2000 दिसत आहे तर याच क्लिपमध्ये तिने एक बालपणीचा हिरव्या रंगातील फ्रॉकचा फोटो शेअर केलाय. दुसऱ्या फोटोतही तिने लहानपणीचा एक फोटो आणि सध्याचा एक फोटो दाखवलाय.

तिसऱ्या क्लिपमध्ये तिचे बालपणीचे फोटो दिसतात. या व्हिडीओ क्लिपमध्ये तिला विचारण्यात येते की, तुझ्या आयुष्यावर पुस्तक आले तर त्याचे शीर्षक काय असेल? याच्या उत्तरादाखल ती म्हणते,''अनफिनिश्ड."

यापूर्वी, प्रियंकाने नमूद केले आहे की, पुस्तकातील प्रत्येक शब्द तिच्या आयुष्यातल्या "आत्मनिरीक्षण आणि प्रतिबिंबा"तून उतरला आहे. 'अनफिनिश्ड' या पुस्तकात प्रियंकाचे काही खासगी निबंध, कथा आणि निरीक्षणे वाचायला मिळतील. तसेच ती पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

प्रियंकाने पुस्तक लिहून पूर्ण झाल्यानंत ट्विटरवरुन चाहत्यांना कळवले होते. "अनफिन्श्ड काम फिनिश झाले! नुकतेच अंतिम हस्तलिखित पाठवले! हे सर्व आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. माझ्या आठवणीतील प्रत्येक शब्द माझ्या आयुष्यातील आत्मपरीक्षण आणि आयुष्याच्या प्रतिबिंबातून आला आहे," असे तिने लिहिले.

प्रियंकाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये नेटफ्लिक्ससोबत अरविंद अडीगाची व्यंगात्मक कादंबरी द व्हाइट टायगर, रॉबर्ट रॉड्रिग्जचा सुपरहिरो फिल्म वी कॅन बी हीरोज, थ्रिलर मालिका सिटीटाईल आणि मॅट्रिक्स-४ या कलाकृतीमध्ये तिची महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details