मुंबई - पायल घोष या अभिनेत्रीने 'मी टू' मोहिमेचा आधार घेत अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले आहेत. अनुराग कश्यपने आपल्यावर बळजबरी केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. ट्विटरवर याबाबत लिहित, तिने अनुरागला अटक करण्याचीही मागणी केली आहे.
पायलच्या या ट्विटला रिट्विट करत कंगना रणौतनेही अनुरागला अटक करण्याची मागणी केली आहे. "एव्हरी व्हॉईस मॅटर्स, मी टू, अरेस्ट अनुराग कश्यप" असे कंगनाने म्हटले आहे.
दरम्यान, पायल घोषने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनुराग कश्यप या दोघांनाही टॅग केले आहे. "मोदीजी, कृपया अनुरागवर कारवाई करा, जेणेकरुन त्याच्या चेहऱ्यामागचा सैतान सर्वांसमोर येईल. मला माहिती आहे माझ्या ट्विटमुळे मला धोका निर्माण होईल, त्यामुळे कृपया मदत करा" अशा आशयाचे ट्विट या अभिनेत्रीने केले आहे.
#MeToo : अनुराग कश्यपवर पायल घोषचे गंभीर आरोप; कंगनाचाही पाठिंबा
दरम्यान, अनुराग कश्यपने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवसांपूर्वीच अनुरागने कंगनावर शेलक्या भाषेत टीका करत, तिला चीनच्या सीमेवर युद्ध करण्यास जायला सांगितले होते. त्यानंतर कंगनानेही अनुरागला प्रत्युत्तर दिले होते.
हेही वाचा :करण जोहर एनसीबीच्या रडारवर! पार्टी प्रकरणी होऊ शकते चौकशी