नवी दिल्ली - अभिनेत्री पायल घोषने आज (बुधवार) केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. चित्रपट दिगदर्शक अनुराग कश्यपवरील बलात्काराच्या तक्रारीचा तपास संथगतीने होत असल्यावरून पायल घोषने गृह राज्यमंत्र्यांजवळ नाराजी व्यक्त केली. सध्या मुंबई पोलिसांकडून या तक्रारीचा तपास सुरू आहे. मात्र, त्यात प्रगती नसल्याचे घोषने म्हटले आहे.
अनुराग कश्यप यांच्यावरील तक्रारीचा तपास संथगतीने सुरू, पायल घोषने व्यक्त केली नाराजी
अभिनेत्री पायल घोषने चित्रपट दिगर्दशक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी तीने तक्रारही दाखल केली आहे. मात्र, तपास संथगतीने होत असल्याचे म्हणत तीने आज केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली.
'माझ्या तक्रारीची माहिती देण्यासाठी मी आज गृह राज्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबई पोलिसांकडून या तक्रारीची चौकशी सुरू असली तरी, अनुराग कश्यप हे खुलेपणाने फिरत आहेत, असे घोषने म्हटले आहे. पायल घोषने चित्रपट दिगदर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
'अनुराग कश्यप यांच्यावरील तक्रारीचा तपास संथगतीने होत आहे, असे मला वाटते. जर गरज पडली तर केंद्र सरकारला हस्तक्षेपाची मागणी मी करणार आहे', असे ती म्हणाली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडेही तीने मदत मागितली आहे.