हैदराबाद - अभिनेत्री परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या घरी हैदराबादला मुक्काम करणार आहे. सायनावर तयार होत असलेल्या आगामी बायोपिकमध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारताना कोणतीच कसूर राहणार नाही याची खबरदारी ती घेत आहे. यासाठी तिने सायनाच्या घरी राहून भूमिकेची तयारी करायचे ठरवले आहे.
परिणीतीने म्हटलंय, ''मला सायना बनायचे आहे. यासाठी तिच्या घरी जाऊन ती कशी राहते हे मला पाहायचे आहे. मी तिला अनेकवेळा भेटली आहे. परंतु यावेळी मी तिच्या घरी जाणार आहे, तिच्यासारखे राहणार आहे आणि त्यांच्यासारखेच मला जेवायचे आहे. तिने मला हे वचन दिलंय की तिची आई मला तेच जेवण देईल जे ती खात असते. त्यामुळे मी तिच्या घरी जाण्यासाठी उत्सुक झाली आहे.''