मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा मालदीवमध्ये कौटुंबिक सुट्टीवर आहे. तिने आपल्या सुट्टीतील गंमती जमतींचा एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचा भाऊ शिवांग चोप्रा गायन करीत असलेला व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिने आता एक 'सनबर्न्ट' पोस्ट शेअर केली आहे. यावर तिला भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत.
परिणीतीने शुक्रवारी पोस्ट केलेल्या फोटोत ती चेरी लाल मखमली मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. या फोटोला तिने शीर्षक दिलंय, "सनबर्न." तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून तिची बहिण आणि इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्रानेही तिचे कौतुक करीत एक मोलाचा सल्लाही दिलाय.