महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ मधील भूमिकेसाठी परिणीती चोप्राने वापरल्या स्वआयुष्यातील वाईट आठवणी

प्रसिद्ध पुस्तकावरून बनलेल्या अभिनेत्री एमिली ब्लंटची मुख्य भूमिका असलेल्या हॉलिवूड चित्रपटाची हिंदी आवृत्ती म्हणजे ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट आहे. हिंदी चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे.

Parineeti Chopra
परिणीती चोप्रा

By

Published : Feb 5, 2021, 7:48 AM IST

मुंबई -परिणीती चोप्राच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या अभिनयामुळे आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर थ्रिलर 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक चर्चेत आहे. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हाच परिणीतीच्या अभिनयाबद्दल सर्व स्तरांवर बोलले गेले. आता परिणीतीने या चित्रपटातील भूमिकेसाठी कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले, हे उघड केले आहे. तिने आपल्या खासगी आयुष्यातील वेदनादायक आठवणी वापरत ही भूमिका साकारली, असे तिने सांगितले.

‘द गर्ल ऑन द ट्रेन' मध्ये माझ्या कामासाठी मिळालेला प्रतिसाद मला खूप समाधान देत आहे. रक्त, घाम आणि अश्रू असे सगळे काही मी ही भूमिका जिवंत करण्यासाठी ओतले आहे. या भूमिकेसाठी माझ्या आयुष्यातील वेदनादायक आठवणी पुन्हा जगले. मी अनेकदा सेटवर रडले. माझ्या मनात अनेक वेदनादायक आठवणी दबलेल्या होत्या, त्यांना मी बाहेर आणत भावनांना वाट मोकळी करून दिली, असे परिणीतीने सांगितले.

परिणीती चोप्रा
परिणीती पुढे म्हणते की, तिच्या आयुष्यातील वेदनादायक अध्यायांना पुन्हा तोंड देण्याचा तिचा कधीच हेतू नव्हता. परंतु मला या चित्रपटासाठी तसे करावेसे वाटले. चित्रपटाची संहिता अत्यंत प्रभावी व चांगल्या पद्धतीने लिहिली होती. ती वाचल्यानंतर मला जाणवले, हे पात्र साकारण्यासाठी मला माझ्या भूतकाळाच्या आत शिरून माझ्या वैयक्तिक आयुष्यातील पुरल्या गेलेल्या वेदना उकरून काढाव्या लागतील. त्या वापरून या व्यक्तिमत्वाचा प्रवास स्क्रीनवर प्रभावी आणि प्रामाणिकपणे दर्शवता येईल.

एका प्रसिद्ध पुस्तकावरून बनलेल्या अभिनेत्री एमिली ब्लंटची मुख्य भूमिका असलेल्या हॉलिवूड चित्रपटाची हिंदी आवृत्ती म्हणजे ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आहे. या आवृत्तीत परिणीती चोप्रा ही ट्रेनमधून प्रवास करणारी एक मद्यपी घटस्फोटितेची भूमिका साकारत आहे. जी एका हरवलेल्या व्यक्तीच्या तपासणीत नकळत सामील होते आणि त्यातून सखोल रहस्ये उघड होतात. ’द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले असून याचा नेटफ्लिक्सवर २६ फेब्रुवारी रोजी डिजिटल प्रीमियर होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details