मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा नुकतीच 'केसरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर आता तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार असून परिणीती या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार परिणीती चोप्रा - the girl on the train
येत्या जुलै महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला यूकेमध्ये सुरूवात होणार आहे. तर २०२० मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
परिणीती चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. तर चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झाले नसल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. येत्या जुलै महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला यूकेमध्ये सुरूवात होणार आहे. तर २०२० मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रिभू दासगुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि अंबलीन एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असणार आहे. हा एक रहस्यमय आणि रोमांचकारी चित्रपट असणार आहे. आता परिणीतीच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.