मुंबई- आपल्या डॅशिंग अंदाजामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमधून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतंच तिनं या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे.
'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या प्रवासाला परिणीतीनं केली सुरूवात - हॉलिवूड चित्रपट
दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आशा आहे, आज परिणीतीसोबत ट्रेनचा हा प्रवास सुरू होईल. लवकरच चित्रपटातील इतर कलाकार आदिती राव हैदरी, क्रिती कुल्हारी आणि अविनाश तिवारीही चित्रीकरणाला सुरूवात करतली, असं त्यांनी म्हटलं आहे.
दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आशा आहे, आज परिणीतीसोबत ट्रेनचा हा प्रवास सुरू होईल. लवकरच चित्रपटातील इतर कलाकार आदिती राव हैदरी, क्रिती कुल्हारी आणि अविनाश तिवारीही चित्रीकरणाला सुरूवात करतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
सुपरहिट ठरलेला हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हा हिंदी रिमेक असणार आहे. रिभू दासगुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि अंबलीन एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असणार आहे. हा एक रहस्यमय आणि रोमांचकारी चित्रपट असणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.