महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

परिणीती म्हणते, आता मजा नव्हे केवळ अभिनय, 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या तयारीला सुरूवात - the girl on the train

इंग्लंड हे माझ्यासाठी फिरणे आणि सुट्टीची मजा घेण्याचे ठिकाण असते. पण यावेळी माझ्यासाठी ते एका शाळेप्रमाणे असणार आहे. हा रोल साकारण्यासाठी आपल्याला इंग्लंडमध्ये यावेळी शाळेप्रमाणेच प्रशिक्षण घ्यावे लागणार असल्याचे परिणीतीने म्हटले आहे.

'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या तयारीला सुरूवात

By

Published : May 8, 2019, 3:07 PM IST

मुंबई- अभिनेत्री परिणीती चोप्रा नुकतीच केसरी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या पाठोपाठ तिने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. हा चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार असून परिणीती सध्या या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना परिणीती म्हणाली, मी या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहे. कारण, या चित्रपटात मी जी भूमिका साकारणार आहे, ती माझ्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. जुलैमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इंग्लंडला रवाना होणार असल्याचे तिने म्हटले आहे.

इतर वेळी इंग्लंड हे माझ्यासाठी फिरणे आणि सुट्टीची मजा घेण्याचे ठिकाण असते. पण यावेळी माझ्यासाठी ते एका शाळेप्रमाणे असणार आहे. हा पूर्णपणे वेगळा रोल साकारण्यासाठी आपल्याला इंग्लंडमध्ये यावेळी शाळेप्रमाणेच प्रशिक्षण घ्यावे लागणार असल्याचे परिणीतीने म्हटले आहे. दरम्यामन चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झाले नसून २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिभू दासगुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details