मुंबई- बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित 'सायना' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता यामुळे ताणली होती. आता या चित्रपटातील 'परिंदा' हे गाणे रिलीज झाले आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्राने आपल्या सोशल मीडियावर हेगाणे शेअर केले आहे. माझे नवीन वर्कआऊट गाणे, असे कॅप्शन तिने गाण्याला दिले आहे. सायना नेहवालचा एक सामान्य खेळाडू ते बॉलिवूड चँपियन बनण्याच्या प्रवासाची एक झलक यात पाहायला मिळते.
या गाण्यात सायनैाच्या भूमिकेत असलेली परिणीती चोप्रा प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या मानव कौलसोबत कठोर मेहनत करताना दिसते. अत्यंत शिस्तीमध्ये ती आपल्या प्रशिक्षणाला सुरूवात करते. खडतर मेहनतीचे फळ तिला स्पर्धांच्या विजयामधून मिळत गेल्याचे या दोन मीनिटांच्या गाण्यात दाखवण्यात आले आहे. मनोज मुन्ताशिर यांनी परिंदा हे गाणे लिहिले असून अमल मलिक यांनी या गाण्याला डिझाईन केले आहे. नव्या खेळाडूंसाठी हे गाणे प्रेरणादायी आहे.