मुंबई - अभिनेता परेश रावल यांनी काही दिवसापूर्वी कोरोनाची लस घेतली होती. लस घेतानाचा फोटटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान परेश रावल यांनी आपली कोविड १९ चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली आहे.
परेश रावल यांनी ही माहिती आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे. ते म्हणतात, ''दुर्दैवाने माझी कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्या संपर्कात १० दिवसापासून जे आले असतील त्यांनी कृपया चाचणी करुन घ्यावी.''
परेश रावल यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच कोविडची लस घेतली होती. त्यांनी लस घेतानाचा फोटोही शेअर केला होता. लस घेतल्यानंतर त्यांनी नर्स, डॉक्टर्स आणि इतरांचे आभारही मानले होते.