परेश रावल यांच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, 'या' अभिनेत्री सोबत साकारणार भूमिका - aditya rawal news
इलाहाबाद मध्ये साकारण्यात आलेली एक रोमँटिक प्रेमकथा या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.
![परेश रावल यांच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, 'या' अभिनेत्री सोबत साकारणार भूमिका paresh rawal son debut on OTT platfom](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6654612-137-6654612-1585973516418.jpg)
मुंबई -कलाविश्वात आणखी एका अभिनेत्याचा मुलगा अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सुप्रसिध्द अभिनेते परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल लवकरच डिजिटल व्यासपीठावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्यासोबत 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'ओटीटी प्लॅटफॉर्म'च्या 'बंफाड' या वेब सीरिजमध्ये त्यांची वर्णी लागली आहे. अनुराग कश्यप आणि नवोदित रंजन चंदेल हे या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.10 एप्रिल रोजी या सीरिज चे प्रीमिअर जी 5 वर होणार आहे.
इलाहाबाद मध्ये साकारण्यात आलेली एक रोमँटिक प्रेमकथा या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. शालिनी यामध्ये नीलम नावाच्या तरुणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर आदित्य नासिर जमाल या युवकाच्या भूमिकेत दिसेल.
अनुराग कश्यपने या वेब सीरिज चे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.