ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कालीन भैय्या पुन्हा येतोय.. पंकज त्रिपाठीने शेअर केले मिर्झापूर-२ चे पोस्टर - पंकज त्रिपाठी मिर्झापूर - २

पहिला सीझन न बघितलेल्यांसाठी चांगली बातमी म्हणजे मिर्झापूरचा पहिला सीझन अ‌ॅमेझॉन प्राईमवर सध्या मोफत बघता येत आहे. विना सबस्क्रिपशन्सचे पहिला सीझन पाहायला मिळत आहे.

मिर्झापूर-2
मिर्झापूर-2
author img

By

Published : Sep 27, 2020, 5:20 PM IST

मुंबई - अ‌ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील बहुप्रतिक्षित मिर्झापूर-2 ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चाहत्यांची प्रतिक्षा आणखीन वाढवत अभिनेता पंकज त्रिपाठीने आज (रविवार) मिर्झापूर-2 या वेब सीरिजचे एक आकर्षक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेता पंकजने मिर्जापूर-2 चे डार्क पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले. रक्तपात आणि बंदुकांच्या शहराचे भीषण वास्तव या फोटोतून दिसत आहे.

या पोस्टरमध्ये एकाबाजूने पदपथावर चढलेली जीप दाखवण्यात आली आहे. नंबर प्लेटच्या जाही किंग ऑफ मिर्झापूर असं लिहलंय. गाडीच्या समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हात आणि हातामध्ये बंदूक असे दृश्य दिसतंय.

in article image
इन्स्टाग्रामवर शेअर केलेले पोस्टर

पहिला सीझन न बघितलेल्यांसाठी चांगली बातमी म्हणजे मिर्झापूरचा पहिला सीझन अ‌ॅमेझॉन प्राईमवर सध्या मोफत बघता येत आहे. विना सबस्क्रिपशन्स पहिला सीझन पाहायला मिळत आहे. पहिल्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल, अमित स्याल, श्रेया पिळगावकर, विक्रांत मेसी, रशिका दुग्गल, राजेश तैलंग, शीबा चड्ढा आणि श्वेता त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

एक्झल मीडिया एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित, मिर्जापूरच्या दुसर्‍या सीझनचा प्रीमियर 23 ऑक्टोबर रोजी अ‌ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे.

हेही वाचा -ड्रग्ज प्रकरणी रकुल प्रीत सिंहची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, मीडिया कव्हरेज थांबवण्याची केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details