पॅन-इंडिया स्टार प्रभासचा पॅन-इंडिया चित्रपट ‘राधे श्याम’ यावर्षी ३० जुलै २०२१ ला चित्रपटगृहांत रिलीज होणार होता. परंतु कोरोनाची आलेली दुसरी लाट भयानक होती व पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळेच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक कोलमडले ज्यात ‘राधे श्याम‘ चे नावसुद्धा आहे. नुकतीच निर्मात्यांनी ‘राधे श्याम‘ च्या प्रदर्शनाची नवीन तारीख घोषित केली आहे.
वर्षाच्या सुरुवातीला १४ जानेवारीला मकर संक्रांति येते आणि दाक्षिणात्य पोंगल सुद्धा. हाच दुहेरी मुहूर्त साधत पुढील वर्षी याच दिवशी ‘राधे श्याम‘ प्रदर्शित होणार आहे. 'राधेश्याम' आणि प्रभासचे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते. पॅन-इंडिया स्टार प्रभासने आपल्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो एका फॅशनेबल लूक मध्ये यूरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की ‘राधेश्याम’ येत्या मकर संक्रांती म्हणजेच पोंगलला म्हणजेच १४ जानेवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.
प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही सर्वांनी माझी रोमँटिक गाथा पाहण्यासाठी जास्त वाट पाहवत नाही, #RadheShyam, या चित्रपटाची जगभरासाठी नवीन रिलीज तारीख आहे - 14 जानेवारी, 2022!"