मुंबई- अभिनेता विकी कौशल सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकतंच विकीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अशात आता विकी लवकरच नोरा फतेहीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
विकी-नोराची रोमँटीक केमिस्ट्री, पछताओगेचा टीझर प्रदर्शित - भूषण कुमार
टीझरमधील नोराचा डान्स आणि विकीचा नेहमीप्रमाणंच असणारा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांची गाण्याबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. या गाण्याला अरिजीत सिंगनं आवाज दिला आहे.
ही जोडी कोणत्या चित्रपटासाठी नव्हे तर एका गाण्यासाठी एकत्र आली आहे. हे दोघं भूषण कुमार यांच्या म्यूझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'पछताओगे' असं शीर्षक असलेल्या या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
४३ सेकंदाच्या या टीझरमध्ये निर्मात्यांनी प्रेमात असलेल्या व्यक्तीच्या भावना उत्तम पद्धतीनं मांडल्या आहेत. टीझरमधील नोराचा डान्स आणि विकीचा नेहमीप्रमाणंच असणारा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांची गाण्याबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. या गाण्याला अरिजीत सिंगनं आवाज दिला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच या गाण्याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यात विकी आणि नोराचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. नोराच्या दिलबर दिलबर आणि ओ साकी साकी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आता तिचं हे वेगळ्या अंदाजातील गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.