महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बडा पछताओगे, नोरा-विकीचं अल्बम साँग प्रदर्शित - डान्स

जोडीदार म्हणजेच विकीपासून लपून एका दुसऱ्या मुलाला डेट करणाऱ्या नोराची कथा आणि या सर्वात विकीची होणारी घालमेल गाण्यात पाहायला मिळते. अरिजीत सिंगनं आवाज दिलेलं हे एक भावनिक गाणं आहे

नोरा-विकीचं अल्बम साँग प्रदर्शित

By

Published : Aug 23, 2019, 11:34 PM IST

मुंबई- अभिनेता विकी कौशल सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकतंच विकीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर आता विकी एका अल्बम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बडा पछताओगे असं शीर्षक असलेल्या या गाण्यात विकीसोबत नोरा फतेहीदेखील आहे. अरिजीत सिंगनं आवाज दिलेलं हे एक भावनिक गाणं आहे. जोडीदार म्हणजेच विकीपासून लपून एका दुसऱ्या मुलाला डेट करणाऱ्या नोराची कथा आणि या सर्वात विकीची होणारी घालमेल गाण्यात पाहायला मिळते.

अनेकदा डान्समधूनच प्रेक्षकांसमोर येणाऱ्या नोराचा आणि विकीचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला वेगळा लूक यात पाहायला मिळत आहे. विकीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत हे आपलं पहिलं अल्बम साँग असल्याचं म्हटलं आहे. आता विकीचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details