मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एकीकडे तिन्ही खानची जादू काही प्रमाणात ढळताना दिसत आहे. तर, दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. आता आणखी एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध खलनायकाचा नातू प्रेक्षकांना करणार 'पागल' - release date
एकीकडे तिन्ही खानची जादू काही प्रमाणात ढळताना दिसत आहे. तर, दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. आता आणखी एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रसिद्ध अभिनेता अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी हा बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज झाला आहे. 'पागल' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटात त्याच्या अपोझिट अभिनेत्री शिवलिका ओबेरॉय झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिराग रूपारेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर डॉ. जयंतीलाल गाडा आणि अमरीश पुरी फिल्मस यांची निर्मिती असणार आहे. आता हे नवीन चेहरे प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.