मुंबई - अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवराकोंडा जरी बॉलिवूडसाठी नवीन असले तरी त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. विजयने तर अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलेले नाही. परंतु 'कबीर सिंग'मुळे विजय देवराकोंडा चर्चेत आला. 'अर्जुन रेड्डी' या तेलगू सिनेमाचा 'कबीर सिंग' हा हिंदी रिमेक होता. 'अर्जुन रेड्डी'मध्ये विजयने साकारलेली भूमिका त्याच्या हिंदीच्या तमाम चाहत्यांनी पाहिली आणि त्याची प्रतीक्षा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. अखेर हा दिवस आता उजाडला आहे.
निर्माता जगन्नाथ पुरी, चार्मी कौर, करण जोहर आणि अपूर्वा मेहता यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली असून यात विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे याची जोडी रुपेरी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार असल्याचे संकेत दिलेत.