महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गुरुनानक जयंती निमित्त देओल परिवाराने केली 'अपने २' ची घोषणा - धर्मेंद्र, सनी, बॉबीसह दोओल परिवाराची तिसरी पिढीही एकाच चित्रपटात

धर्मेंद्र, सनी, बॉबीसह दोओल परिवाराची तिसरी पिढीही एकाच चित्रपटात झळकणार आहे. २००७ मध्ये आलेल्या अपने या चित्रपटाचा सीक्वेल येत असून यात संपूर्ण देओल कुटुंब काम करणार आहे. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने आज ही घोषणा करण्यात आली.

Announcing the new movie 'Apne 2'
अपने २' ची घोषणा

By

Published : Nov 30, 2020, 4:32 PM IST

मुंबई- देओल कुटुंबीयांनी सोमवारी गुरुनानक जयंतीनिमित्त त्यांच्या 'अपने 2' या नवीन चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटात देओल कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसणार आहेत. याची घोषणा करत सनी देओल यांनी आपल्या अधिकृत खात्यावर ट्विट केले की, "बाबाजींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे आम्ही आज पुन्हा एकत्र येत आहोत. माझे वडील, भाऊ आणि यावेळी मुलासमवेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला धन्यता वाटत आहे. "

हेही वाचा - 'आशिकी' फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटीत दाखल

अनिल शर्मा दिग्दर्शित आणि दीपक मुकुट निर्मित या चित्रपटाचे शूटिंग मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून पुढीलवर्षी दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा शिवसेना प्रवेश आज नव्हे तर उद्या

कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित ‘अपने’ हा चित्रपट वर्ष २००७मध्ये आला होता, यामध्ये सनी आणि बॉबी देओल धर्मेंद्रसोबत एकत्र दिसले होते. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि शिल्पा शेट्टी यांनीही अभिनय केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details