नवी दिल्ली - मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी गुलाबो सीताबो ट्विस्टर चॅलेंज सुरू केल्याच्या दुसऱ्या दिवशी, विकी कौशल आणि यामी गौतम यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हे आव्हान स्वीकारले आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोणतीही कसर सोडली नाही. तथापि, विक्की कौशलनेच करण जोहरला लाजवले. या चॅलेंजमध्ये एकच वाक्य पाचवेळा सलग म्हणायचे आहे.
गुलाबो सीताबो ट्विस्टर चॅलेंजसाठी वाक्य आहे : 'गुलाबो की खटर-पटर से तीतर-बितर सीताबो, सीताबो के अगर-मगर से उथल-पुथल गुलाबो'. हे वाक्य सलग पाचवेळा म्हणायचे असल्यामुळे फंबल होण्याची शक्यता शंभर टक्के आहे. मात्र बॉलिवूडच्या या यशस्वी कलाकारांनी जोरदार प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. वरील वाक्य हे गुलाबो सितोबो मधील एक मजेशीर कॉमेडी संवाद आहे.