भोपाळ - बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाने मध्य प्रदेशात 'छोरी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया येथे शूटिंग सुरू झाले आहे. शूटिंग सुरू करण्यापूर्वी मुहूर्ताची पूजा करण्यात आली. यावेळी चित्रपटातील कलाकारांसह क्रू मेंबर्स उपस्थित होते. चित्रपटाची टीम डिसेंबरपर्यंत मध्य प्रदेशात शूटिंग करेल. त्यानंतर अखेरचे शेड्यूल मुंबईत पार पडणार आहे.
हेही वाचा - अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर रिलीज