मुंबई - अक्षय कुमार त्याच्या लाईव्ह अॅक्शनबद्दल ओळखल जातो. बॉलिवूडचा हा खिलाडी कुमार सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आलाय. त्याने शेअर केलेला 'बोटल कॅप चॅलेंज'चा व्हिडिओ सध्या गाजतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ३८ लाख वेळा पाहिला गेलाय.
अक्षय कुमारने बाटली न पाडता किकने बाटलीचे बूच उडवण्याचे चॅलेंज घेतले होते. या व्हिडिओत अक्षय राऊंड किकने बाटलीचे बूच अचूक उडवतो आणि बाटली जागेवरच स्थिर राहते. हे पाहायला मिळते. त्याच्या जबरदस्त किकची सध्या जोरदार चर्चा आहे.