महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा, 'शुभमंगल ज्यादा सावधान'च्या इरसाल फॅमिलीची खुमासदार झलक - 'शुभमंगल ज्यादा सावधान' चित्रपटाच्या व्यक्तीरेखा

आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या 'शुभमंगल ज्यादा सावधान' चित्रपटाच्या व्यक्तीरेखा कोण असतील याचा उलगडा झाला आहे. अॅनिमेशनच्या माध्यमातून ही फॅमिली कोण याचा खुलासा करण्यात आलाय. अधिक धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल.

शुभमंगल ज्यादा सावधान

By

Published : Sep 19, 2019, 5:36 PM IST

मुंबई - 'शुभमंगल ज्यादा सावधान' या नव्या चित्रपटाची चर्चा सध्या जोरात आहे. आयुष्यमान खुराणाच्या नावावर सलग हिट चित्रपट येत आहेत. २०१८ मध्ये त्याचे अंधाधुन आणि बधाई हे दोन चित्रपट हिट झाले तर २०१९ मध्ये आर्टीकल 15 आणि ड्रीम गर्ल हिट झाला. आता त्याचा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे आणि याचे शीर्षक आहे 'शुभमंगल ज्यादा सावधान'.

'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर त्याचा दुसरा भाग येत आहे. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची जोडी पुन्हा या चित्रपटात पाहायला मिळेल.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन 'शुभमंगल ज्यादा सावधान' चित्रपटाच्या व्यक्तीरेखा कोण असतील याचा उलगडा झाला आहे. अॅनिमेशनच्या माध्यमातून ही फॅमिली कोण याचा खुलासा करण्यात आलाय.

'शुभमंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्या यांनी केलंय. १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details