महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘सत्यापेक्षा जास्त ताकद कशातच नाही’, रितेश देशमुखचं रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ ट्विट - रितेश देशमुखचं रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ ट्विट

रिया चक्रवर्तीला ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर आजवर तिची बाजू घेण्यासाठी कचरत असलेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिची उघडपणे बाजू घ्यायला सुरूवात केली. यात अभिनेता रितेश देशमुख याचाही समावेश आहे.

-riteish-deshmukh-tweeted-in-support-of-rhea-chakraborty
रितेश देशमुखचं रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ ट्विट

By

Published : Oct 13, 2020, 4:35 PM IST

मुंबई - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर झालेल्या तपासात अंमली पदार्थांचं सेवन केल्याच्या आरोपावरून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या रिया चक्रवर्तीला ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर आजवर तिची बाजू घेण्यासाठी कचरत असलेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिची उघडपणे बाजू घ्यायला सुरूवात केली. यात अभिनेता रितेश देशमुख याचाही समावेश आहे.
तुरूंगातून जामीनावर बाहेर येताच रियाने सुशांत मृत्यू प्रकरणात माध्यमांकडून पब्लिसिटी मिळवण्याच्या नादात स्वैर आरोप करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करायला सुरूवात केली आहे. रियानी तिची शेजारीण डिंपल थिवानी हिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

रितेश देशमुखचं रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ ट्विट
यानंतर रितेशने पेपरमध्ये आलेली ही बातमी ट्विट करत ‘तुला लढण्याचं बळ मिळो रिया, सत्यापेक्षा ताकदवान जगात दुसरं काहीच नाही’ असं लिहिलं आहे. सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी रिया आणि सुशांत एकत्र होते आणि मी स्वतः त्यांना एकत्र पाहिलं होतं असा दावा डिंपलने काही माध्यमांशी बोलताना केला होता. यामुळे या मृत्यूला एक वेगळंच वळण मिळालं. मात्र या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयसमोर जबानी देताना डिंपल आपल्या दाव्यावरून पलटली. सीबीआयशी बोलताना सुशांत आणि रिया त्याच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी एकमेकांना भेटले होते असं मी कुणाकड़ून तरी ऐकलं होतं. मात्र मी स्वतः त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही असा जबाब तिने सीबीआय़ला दिला. त्यामुळे ती खोटं बोलत असल्याचं उघड झालं. त्यामुळेच तपास यंत्रणांना चुकीची माहिती देऊन भरकटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि आपल्याबद्दल चुकिची माहिती माध्यमांना दिल्याबद्दल डिंपलवर कारवाई करावी अशी मागणी रियाने पोलीसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत केली आहे. त्यामुळे आपल्याविरोधात गरळ ओकणाऱ्या लोकांना रिया आता जशास तसा धडा शिकवण्याची शक्यता आहे. ७ तारखेला रिया आणि सुशांतचे हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरिही रियाचा भाऊ शौविक आणि अब्दुल बसीत परिहार याचा जामीन अद्याप मंजूर केलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details