मुंबई- बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीने मुन्नाभाई फ्रँचायझीच्या अपेक्षित तिसर्या भागाबाबत एक प्रमुख अपडेट शेअर केली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि लेखक अभिजात जोशी यांच्याकडे तब्बल तीन स्क्रिप्ट्स हातात तयार असल्याचे त्याने सांगितले.
चित्रपट निर्माता राजकुमार हिरानी आणि विधु विनोद चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या फ्रेंचायझीमध्ये मुन्नाभाई (संजय दत्त) आणि त्याच्या साइडकिक सर्किट (वारसी) यांची आनस्क्रिन जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळाली होती.
मुन्नाभाईच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा
२००३ मध्ये मुन्नाभाई एमबीबीएसचा पहिला चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. त्यानंतर २००६ मध्ये लागो रहो मुन्ना भाईचा सिक्वेल आला. बहुप्रतिक्षित तिसरा चित्रपट बर्याच काळापासून चर्चेत आला आहे, परंतु अद्याप याबाबतची खात्री झालेली नाही.
अरशद वारसीने अलीकडेच हा खुलासा केला आहे की मुन्नाभाई फ्रँचायझीमध्ये तिसर्या भागासाठी तीन स्क्रिप्ट्स तयार आहेत, पण नजीकच्या काळात हा चित्रपट तयार होईल की नाही याबद्दल त्याला शंका आहे.