मुंबई- नोरा फतेही सध्या आपल्या 'ओ साकी साकी' गाण्यानं इंटरनेटवर चांगलीच गाजली आहे. जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेल्या 'बाटला हाऊस' चित्रपटातील 'साकी साकी' गाण्यासाठी तिनं डान्स केला आहे. या गाण्यासाठीचा फायर डान्स आपण केवळ ३ दिवसात शिकला असल्याचे नोराने सांगितले आहे.
'ओ साकी साकी' गाण्यासाठी नोरा केवळ ३ दिवसात शिकली फायर डान्स - बाटला हाऊस
तुलसी कुमार म्हणाली, या गाण्याची निर्मिती टी सीरिजमार्फत केली आहे. मात्र, भूषण कुमार माझे भाऊ असले तरीही या गाण्यासाठी मला ऑडिशन द्यावी लागली.
या रिक्रिएट व्हर्जनला तुलसी कुमारनं आपला आवाज दिला आहे. नुकतंच तुलसी आणि नोरा यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला. हे गाणं तयार करण्याचा प्रवास आपल्यासाठी अतिशय सुंदर होता, असं त्या म्हणाल्या. नोराने आपल्या डान्सनं प्रेक्षकांकडून फक्त कौतुकाची थापच मिळवली नाही, तर गाण्याला आतापर्यंत ७० मिलियन व्ह्यूजही मिळाले आहेत.
तुलसी कुमार म्हणाली, या गाण्याची निर्मिती टी सीरिजमार्फत केली आहे. मात्र, भूषण कुमार माझे भाऊ असले तरीही या गाण्यासाठी मला ऑडिशन द्यावी लागली. दरम्यान या गाण्याला तुलसीशिवाय नेहा कक्कर आणि बी प्राक यांनीही आवाज दिला आहे. तर तनिष्क बागची यांचे बोल आहेत.