मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही अलिकडे तिच्या सोशल मीडियावरील डान्समुळे खूप चर्चेत आहे. अलिकडेच तिचे 'नाच मेरी रानी' हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याने धमाल उडवून दिली आहे. नोरा फतेही या गाण्याचे जोरदार प्रमोशन करीत आहे. अलिकडेच तिचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती आवेज दरबारसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यात आवेजसोबत दमदार स्टेप्स करीत नोराने आपला जलवा दाखवून दिलाय.
व्हिडिओमध्ये नोरा फतेही ब्राऊन कलरच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. नोरा आणि आवेजचा व्हिडिओ 'मुंबई डान्सर्स'ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. भरपूर प्रतिक्रियाही मिळत आहेत.