महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नोरा फतेही म्हणते.. मी 'मीम्स क्वीन', सोशल मीडियावरील मीम्स माझ्यावर परिणाम नाही - अभिनेत्री व आयटम साँग डान्सर नोरा फतेही

अभिनेत्री व आयटम साँग डान्सर नोरा फतेहीने म्हटले आहे, की सोशल मीडियावर मी मीम्स-क्वीन आहे. टीकात्मक मीम्सचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. या सर्व गोष्टी मी विनोदात घेते.

nora-fatehi-memes-dont-affect-me
नोरा फतेही म्हणते.. मी 'मीम्स क्वीन'

By

Published : Apr 1, 2020, 7:19 PM IST

मुंबई – अभिनेत्री व आयटम साँग डान्सर नोरा फतेहीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या मीम्सवर नेटीझन्सनी भन्नाट प्रतिक्रिया देत नोराला ट्रोल केले आहे. यावर नोराने म्हटले आहे, की सोशल मीडियावर मी मीम्स-क्वीन आहे. टीकात्मक मीम्सचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. या सर्व गोष्टी मी विनोदात घेते.

फिल्म एक्ट्रेस नोरा फतेहीने एक मीम शेअर करत म्हटले होते की, २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर ती आपल्या घरातून कोणत्या अंदाजात बाहेर पडणार आहे. अभिनेत्री नोरा फतेही नुकत्याच रिलीज झालेल्या स्ट्रीट डान्सर चित्रपटात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत दिसली होती. नोराने सोशल मीडियावर एक मीम शेअर करून गंमतीत म्हटले होते, की देशात सुरू असलेल्या टाळेबंदीनंतर ती कशा पद्धतीने घराबोहर पाऊल ठेवणार आहे.

नोरा कॅनडातून बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी भारताता आली. बाहुबलीमध्ये आयडम साँग केल्यानंतर ती बिग बॉसमध्ये झळकली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details