मुंबई :अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही आगामी 'बेल बॉटम' या चित्रपटात असणार नाही. तिच्यावतीने हे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक माध्यमांच्या बातम्यामध्ये असे सांगण्यात येत होते की 'बेल बॉटम' सिनेमात नोरा फतेही अक्षय कुमारसोबत आयटम साँग करीत आहे. नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने या बातमीचे खंडन केले आहे.
नोरा फतेही हिने बेल बॉटम चित्रपटासाठी डान्स केलाय ही बातमी चुकीची असून या निराधार बातमीशी तिचा काहीच संबंध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा - 'नाच मेरी रानी' गाण्यावर नोरा फतेहीचा आवेज दरबारसोबत जलवा
रणजित एम. तिवारी दिग्दर्शित 'बेल बॉटम' या चित्रपटात अक्षयसोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता यांची मुख्य भूमिका आहे. हा एक स्पाय थ्रिलर असून 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - वरुण धवन - नोरा फतेहीची हॉट केमेस्ट्री, 'स्ट्रीट डान्सर'चं बोल्ड गाणं पाहिलं का?
नोराचे आगामी चित्रपट
कामाच्या बाबतीत विचार केला तर नोरा फतेही आगामी 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातही ती आपल्या गाण्यातून धमाल उडवणार असल्याचे समजते. याशिवाय ती 'दिलबर', 'कमरिया', 'साकी-साकी' आणि 'एक तो काम जिंदगानी' या गाण्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.