मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या जबरदस्त डान्स मूव्हमुळे नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या नटखट अदा आणि लालित्यपूर्ण डान्सने सर्वांनाच चकित करीत असते. अलीकडेच तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही स्टेजवर 'दिलबर' या गाण्याचे अरबी व्हर्जन गात असताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये या गाण्यावर आपल्या सहकार्यांसोबत धमाल करताना दिसत आहे. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ तिच्या फॅन क्लबने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
हेही वाचा - कामगार संघटनांच्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी बंदला काँग्रेसचा पाठिंबा - बाळासाहेब थोरात
नोरा फतेहीच्या या व्हिडिओमध्ये तिने सिल्व्हर कलरचा सिमी आउटफिट परिधान केला आहे. नृत्याबरोबर गाण्याची प्रतिभा नोराच्या या व्हिडिओमध्ये दिसून येते. चाहते या अभिनेत्रीच्या व्हिडिओवर बरीच कमेंट करत आहेत आणि तिला अभिप्राय देत आहेत.
हेही वाचा - पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..
नोरा फतेहीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच 'भुज दि प्राईड ऑफ इंडिया' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नोरा फतेही तिच्या डान्सवर थिरकताना दिसणार आहे. नोराला अखेरचे 'स्ट्रीट डान्सर 3 डी'मध्ये पाहिले होते, यात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते.