मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर गर्ल नोरा फतेहीबद्दल ( ( Nora Fatehi ) ) धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोराच्या कारला अपघात झाला ( Nora Fatehi accident ) आहे, पण अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अपघाताच्या वेळी नोरा कारमध्ये नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातावेळी नोरा तिच्या नवीन गाण्याच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये होती. नोरा या कारमध्ये बसून कार्यक्रमासाठी पोहोचली होती.
नोरा सध्या पंजाबी गायक गुरु रंधावासोबत ( Singer Guru Randhawa ) तिच्या 'डान्स मेरी रानी' या ( Dance Meri Rani Song ) नवीन गाण्यामुळे चर्चेत आहे. या कारमधून गाण्याच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी नोरा आणि गुरु पोहोचले होते. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता हा अपघात झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोराच्या ड्रायव्हरने एका ऑटोला धडक दिली. त्यावेळी रस्त्यावरील लोकांनी कारला घेराव घालून चालकाला कारमधून बाहेर ( Crowd pulls Driver Out ) काढले. घटनास्थळी पोहोचलेल्या नोराने ऑटोचालकाला एक हजार रुपये दिले आणि तेथून निघून गेली. या अपघातात कार आणि ऑटो चालक सुरक्षित असले तरी दोन्ही वाहनांचे अंशत: नुकसान झाले आहे.