मुंबई - अभिनेता विकी कौशल सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकतंच विकीला उरी - द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अशात आता विकी लवकरच नोरा फतेहीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
विकी-नोराची जोडी ऑनस्क्रीन येणार एकत्र, पहिलं पोस्टर प्रदर्शित - ओ साकी साकी
आता विकी लवकरच नोरा फतेहीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ही जोडी कोणत्या चित्रपटासाठी नव्हे तर एका गाण्यासाठी एकत्र आली आहे. या गाण्याला अरिजीत सिंगनं आवाज दिला आहे
ही जोडी कोणत्या चित्रपटासाठी नव्हे तर एका गाण्यासाठी एकत्र आली आहे. हे दोघं भूषण कुमार यांच्या म्यूझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'पछताओगे' असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्याचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात विकी आणि नोराचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
या गाण्याला अरिजीत सिंगनं आवाज दिला आहे. प्रदर्शित करण्यात आलेलं हे पोस्टर गाण्याबद्दलची उत्कंठा वाढवणारं आहे. नोराच्या दिलबर दिलबर आणि ओ साकी साकी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आता तिचं हे वेगळ्या अंदाजातील गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.