मुंबई- बॉलिवूडची आयटम नंबर डान्स गर्ल नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नोराचा सर्वोत्तम डान्स आणि किलर मूव्ह्स तिच्या चाहत्यांना आकर्षित करतात. आता नोराच्या नृत्याची जादू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही दिसणार आहे. खरंतर, नोरा फतेही बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनाससोबत अबू धाबी येथे एका आगामी कार्यक्रमात स्टेज शेअर करताना दिसणार आहे.
आपल्या माहिती करता सांगायचे तर , विडकॉन (VidCon) कंपनी 3 डिसेंबरला अबू धाबीमध्ये एक कार्यक्रम करणार आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात नोरा तिच्या चास्टबस्टर्स (Chastbusters) गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. 3 डिसेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नोराने पंजाबी गायक हार्डी संधूसोबत अनेक डान्स नंबरची रिहर्सल केल्याचे सांगितले जात आहे. त्याच वेळी, प्रियांका चोप्राचा पती आणि अमेरिकन गायक निक जोनास देखील या शोचा एक भाग असेल.