मुंबई- बॉलीवूडचे जोडपे विकी कौशल आणि कॅटरिना कैफ त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे एकत्र घालवणार नाहीत. मालदीवमध्ये लहान हनीमूननंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत. V-Day रोजी VicKat वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसणार आहेत, कारण कॅटरिना आगामी 'टायगर 3' चे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे.
सुपरस्टार सलमान खान आणि कॅटरिना शनिवारपासून मुंबईत 'टायगर 3' चे शूटिंग पुन्हा सुरू करणार आहेत. याव्यतिरिक्त 14 फेब्रुवारीपासून चित्रपटाचे शेवटचे मोठे शेड्यूल पूर्ण करण्यासाठी दोघेही दिल्लीला जातील, कारण तिसरी लाट देशभरात मंदावते आहे. हे शेड्यूल चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सलमान-कॅट राष्ट्रीय राजधानीत सुमारे 10-12 दिवस चित्रीकरण करणार आहेत.
27 जानेवारी रोजी कॅटरिना मालदीवमधून परतली. तिथे तिने एका पेय पदार्थाच्या जाहिरातीसाठी शूटिंग केले. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो पोस्ट केले. यात ती खूपच सुंदर दिसत होती.
दरम्यान विकीने नुकताच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित त्याचा आगामी चित्रपट पूर्ण केला. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे इंदौरमध्ये मोठ्या प्रमाणावर शुटिंग करण्यात आले आहे. यात विक्कीच्या विरुद्ध सारा अली खान आहे. जेव्हा विकी मध्य प्रदेशात शूटिंग करत होता, तेव्हा कॅटरिनाने त्यांची पहिली लोहरी एकत्र साजरी करण्यासाठी त्याला भेट दिली होती. आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी श्रीयुत कौशल आपल्या पत्नीला राष्ट्रीय राजधानीत उतरून आश्चर्यचकित करतात का हे पाहणे मनोरंजक असेल.
हेही वाचा -वाणी कपूरच्या नवीन व्हिडिओने इंटरनेटवर तुफान