महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अश्शी पर्स सुरेख बाई' : नीता अंबानींच्या हँडबॅगला २४० हिरे - Kareena Kapoor

नीता अंबानी वापरत असलेल्या हँडबॅगला २४० हिरे आहेत. २ कोटी ६० लाखाची ही बॅग सध्या चर्चेत आहे. अंबानी यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फोटो अंबानी फॅमिली इन्स्टाग्रामच्या सौजन्याने

By

Published : Jun 28, 2019, 5:05 PM IST


मुंबई - रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन असलेल्या नीता अंबानी सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चेत आहेत. त्याचे कारणही खास आहे. त्या वापरत असलेल्या बॅगची किंमत ऐकाल तर तुम्हीही चाट पडाल. या बॅगला २४० हिरे लावण्यात आले आहेत. ज्याची किंमत आहे २ कोटी ६० लाख रुपये.

नीता अंबानींच्या हातात असलेल्या या बॅगचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो अंबानी परिवाराच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आलाय. या फोटोत नीता अंबानीसोबत करिना कपूर आणि करिश्मा कपूर दिसत आहेत.

एका वेबसाईटच्या म्हणण्यानुसार हर्मिस हिमालय बिर्किन बॅग ही हँडबॅग कलेक्शनमधील सर्वात चांगली बॅग समजली जाते. यात १८ कॅरेट सोन्याच्या हार्डवेअरवर २४० हिरे लावण्यात आलेत. २०१७ मध्ये अशाच प्रकारची पांढरी हिमालय क्रोकोडाइल डायमंड स्टाइल बॅग ३,७९,२६१ डॉलर म्हणजेच २ कोटी ६० लाख रुपयांना विकण्यात आली होती. त्यावेळी दावा करण्यात आला होता की ही सर्वात महाग बॅग आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details