मुंबई -बॉलीवूडमधील नवविवाहित दाम्पत्य अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल मंगळवारी (दि. 26 जाने.) अलीबागहून मुंबईत परसते आहेत.
वरुण अन् नताशा अलीबागहून परतले मुंबईला - natasha dalal news
वरुण व नताशा हे लग्नानंतर मुंबईत परतले आहेत. रविवारी (दि. 24 जाने.) वरुणने अलीबागच्या द मेंशन हाउस रिसॉर्टमध्ये त्याची प्रेयसी व फॅशन डिझाइनर नताशासह लग्नाच्या बंधनात अडकला.
अलीबाग ते मुंबई परतताना नवविवाहित जोडप्याला एका बोटमध्ये जाताना पाहण्यात आले आहेत. दोघांनीही कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मास्क लावला होता. रविवारी वरुणने अलीबागच्या द मेंशन हाउस रिसॉर्टमध्ये त्याची प्रेयसी फॅशन डिझाइनर नताशासह लग्नाच्या बंधनात अडकला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नामध्ये केवळ परिवारातील लोक व जवळच्या मित्रांनाच आमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचा - आपल्या मुलाला बोहल्यावर चढलेला बघून करण जोहरच्या डोळ्यात तराराले आनंदाश्रू!