भुज - द प्राईड ऑफ इंडिया या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लॉन्च झाला आहे. सत्य कथेवर आधारित या चित्रपटामध्ये सैनिक आणि गावकऱ्यांनी दाखवलेले असामान्य साहस आणि शत्रूवर केलेला प्रहार या ट्रेलरमध्ये दिसतो. सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे.
या ट्रेलरमध्ये अजय देवगणच्या तोंडी आणखी एक दीर्घ डायलॉग लक्ष वेधणारा आहे. दुश्मानांचा सामना करणारे प्रभारी आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक म्हणतात, ''तू हमारे औकात का अंदाजा क्या लगायेगा, हम उस महान छत्रपती शिवाजी महाराज की औलाद है जिन्होने मुघलों को घुटने पे ला दिया था. और अपने खून से हिंदुस्थान का इतिहास लिखा था.''
या चित्रपटाच्या पहिल्या भागातील संवादही असेच गाजलेले होते. यातील लक्ष वेधणारे काही डायॉग्ज पुढील प्रमाणे -
''मराठा सिर्फ दो ही बात जानता है...मारना या मरना''
''किसी की जान बचाने के लिए की गई हिंसा धर्म है, ताजमहल प्यार की निशानी है तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है''