मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडीया यांचा भाचा करण कपाडीया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी 'ब्लँक' चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकेल. या चित्रपटाचे पहिले पोस्टर अलिकडेच रिलीज करण्यात आले होते. यानंतर आता चित्रपटाचे आणखी दोन नवे टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'ब्लँक'चं नवं पोस्टर प्रदर्शित, पाहा करण कपाडीया आणि सनी देओलचा लूक - movie
या नव्या पोस्टररमध्ये सनी देओल आणि करण कपाडीया यांचे फक्त डोळे दाखवण्यात आले आहेत. तर पहिलं पोस्टर पूर्णपणे ब्लँक होतं.
या नव्या पोस्टररमध्ये सनी देओल आणि करण कपाडीया यांचे फक्त डोळे दाखवण्यात आले आहेत. तर पहिलं पोस्टर पूर्णपणे ब्लँक होतं. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे.
या चित्रपटाची कथा काय आहे, यामध्ये आणखी कोणते कलाकार झळकणार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये इशिता दत्ताचीही वर्णी लागली आहे. 'ब्लँक' चित्रपटाचे दिग्दर्शन बेहजाद खंबाटा हे करत आहेत. तर, निर्मिती डॉ. श्रीकांत भासी, निशांत पिट्टी, टोनी डिसुजा आणि विशाल राणा हे करत आहेत. मे महिन्यातील ३ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.