मुंबई- सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी छिछोरे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच कॉलेजमधील ग्रुप फ्रेंडशिपवर आधारित असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यासोबतच मैत्रीची झलक आणि मित्रांमधील मस्ती दाखवणारी चित्रपटातील काही गाणीही प्रदर्शित करण्यात आली होती.
निखळ प्रेमाची भावनिक झलक, छिछोरेमधील खैरियत गाणं प्रदर्शित - सहर्ष शुक्ला
चित्रपटातील श्रद्धा आणि सुशांतच्या निरागस प्रेमाची भावनिक झलक दाखवणारं गाणं प्रदर्शित झालं आहे. खैरीयत असं या गाण्याचं शीर्षक आहे. प्रेमाची अलगद सुरुवात आणि काहीसे दुरावे यात पाहायला मिळतात.

यानंतर आता चित्रपटातील श्रद्धा आणि सुशांतच्या निरागस प्रेमाची भावनिक झलक दाखवणारं गाणं प्रदर्शित झालं आहे. खैरीयत असं या गाण्याचं शीर्षक आहे. प्रेमाची अलगद सुरुवात आणि काहीसे दुरावे यात पाहायला मिळतात. या गाण्याला अरिजीत सिंगनं आवाज दिला आहे.
प्रितम यांनी हे गाणं कंपोज केलं आहे, तर अमिताभ भट्टाचार्य यांचे बोल आहेत. सिनेमात सुशांत आणि श्रद्धाशिवाय वरुण शर्मा, प्रतीक बब्बर, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि ताहिर राज भसीन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नितेश तिवारी यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.