मुंबई- कंगना आणि राजकुमार राव क्वीन चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. आगामी 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटात ही जोडी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट शीर्षकाच्या वादापासून रिलीज डेटपर्यंत चांगलाच चर्चेत राहिला.
कंगना-राजकुमारच्या 'जजमेंटल हैं क्या'मधील 'द वखरा साँग' प्रदर्शित - rajkumar rao
चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'द वखरा साँग' असं या गाण्याचं शीर्षक आहे. हे गाणं २०१५ मध्ये आलेल्या बादशाह आणि नव इंदर यांच्या 'वखरा' स्वॅग गाण्याचं रिमिक्स व्हर्जन आहे.
या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'द वखरा साँग' असं या गाण्याचं शीर्षक आहे. हे गाणं २०१५ मध्ये आलेल्या बादशाह आणि नव इंदर यांच्या 'वखरा' स्वॅग गाण्याचं रिमिक्स व्हर्जन आहे. चित्रपटाची निर्माती एकता कपूरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या गाण्याला नव इंदर, लिसा मिश्रा आणि रजा कुमारी यांनी आवाज दिला आहे. या चित्रपटात कंगना आणि राजकुमार राव यांच्याशिवाय जिम्मी शेरगिल आणि अमयरा दस्तूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.