महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'हौली हौली', 'दे दे प्यार दे'मधील आणखी एक नवं गाणं प्रदर्शित - rakul preet singh

'हौली हौली' असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात अजय, रकुल आणि तब्बू यांचा जबरदस्त डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

'दे दे प्यार दे'मधील नवं गाणं प्रदर्शित

By

Published : Apr 26, 2019, 12:24 PM IST

मुंबई- बॉलिवूड सिंघम म्हणजेच अजय देवगण लवकरच 'दे दे प्यार दे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू आणि रकुल प्रीत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आता या चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'हौली हौली' असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात अजय, रकुल आणि तब्बू यांचा जबरदस्त डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. गॅरी संधू आणि नेहा कक्करने या गाण्याला आवाज दिला आहे. पूर्वाश्रमीची पत्नी आणि २४ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड यांच्यात अडकलेल्या अजयची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

अकिव अली यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. तर भूषण कुमार, क्रिशन कुमार, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता हे नवं गाणं प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरतं का? हे पाहूया. दरम्यान १७ मेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details