मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेला 'कलंक' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. चित्रपटातील गाणी आणि पोस्टर गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच 'कलंक नहीं इश्क हैं काजल पिया' हे शीर्षक गीत प्रदर्शित करण्याात आलं होतं.
यापाठोपाठ आता चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हे गाणं माधुरीवर चित्रीत झालं असून तिचा अफलातून डान्स प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे. 'तबाह हो गये' असं या गाण्याचं शीर्षक आहे. या गाण्यातील माधुरीचा एक फोटो नुकताच समोर आला आहे.
या फोटोमधील तिचा लूक पाहून तुम्हाला नक्कीच 'देवदास'मधील 'किसने ये हमपे हरा रंग डाला' या गाण्याची आठवण येईल. या गाण्यातील तिची वेशभूषाही 'देवदास'मधील त्या गाण्याशी मिळती जुळतीच आहे. लवकरच हे गाणं प्रदर्शित होणार आहे. अशात माधुरीचे चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.