मुंबई- परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची 'जबरिया जोडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित त्यांच्या या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. यानंतर चित्रपटातील काही गाणीही प्रदर्शित करण्यात आली. ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली.
'ख्वाब फरोशी'..'जबरिया जोडी'मधील आणखी एक भावनिक गाणं प्रदर्शित - चंदन रॉय
'ख्वाब फरोशी' असं या गाण्याचं शीर्षक आहे. तुटलेल्या मनांसाठीचं भावनिक गाणं प्रदर्शित, असं कॅप्शन देत परिणीतीनं हे गाणं शेअर केलं आहे.गाण्याला सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांनी आवाज दिला आहे.
आता या सिनेमातील आणखी एक भावनिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'ख्वाब फरोशी' असं या गाण्याचं शीर्षक आहे. तुटलेल्या मनांसाठीचं भावनिक गाणं प्रदर्शित, असं कॅप्शन देत परिणीतीनं हे गाणं शेअर केलं आहे. नात्यात आलेल्या दुराव्यानंतर सिद्धार्थने उचलेलं पाऊल आणि दोघांच्या मनाची होणारी घालमेल या गाण्यात पाहायला मिळते.
गाण्याला सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांनी आवाज दिला आहे. तर सिद्धार्थ आणि गरिमा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. दरम्यान या चित्रपटात सिद्धार्थ परिणीतीशिवाय अपारशक्ती खुराणा, संजय मिश्रा, जावेद जाफरी, चंदन रॉय आणि गोपाल दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रशांत सिंग यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.