मुंबई- सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला 'भारत' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटातील आणखी एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
सलमानच्या 'भारत'मधील 'जिंदा हूं मैं तुझमें' गाणं प्रदर्शित - katrina kaif
भारत चित्रपटातील चौथ गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'जिंदा हूं मैं तुझमें' असं या गाण्याचं शीर्षक आहे. विशाल ददलानी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.
'जिंदा हूं मैं तुझमें' असं या गाण्याचं शीर्षक आहे. देशभक्तीवर आधारित या गाण्यात फाळणीनंतर वडिलांपासून दुरावल्याने आलेल्या जबाबदाऱ्यांपासून देशासाठी लढता-लढता म्हातारपणं आलेल्या, मात्र तरीही देशासाठी काहीतरी करण्याचा अट्टाहास असणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा सलमानचा संघर्ष पाहायला मिळत आहे. या गाण्यात सलमानशिवाय कॅटरिना आणि दिशा पटानी यांचीही झलक पाहायला मिळत आहे.
विशाल ददलानी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर गुलशन कुमार आणि टी सीरिज यांची निर्मिती आहे. 'भारत' चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. तर अतूल अग्निहोत्री, अल्वीरा खान अग्निहोत्री, भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांची निर्मिती असणार आहे.