मुंबई- 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटानंतर अनुपम खेर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. वन डे असं या चित्रपटाचं नावं असून यात ते वकिलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता या तारखेत बदल करण्यात आला आहे.
अनुपम-ईशाच्या 'वन डे'ची रिलीज डेट बदलली, आता या दिवशी होणार प्रदर्शित - isha gupta
काही दिवसांपूर्वीच वन डे चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता या तारखेत बदल करण्यात आला आहे.

आता हा चित्रपट येत्या ५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अनुपम खेरशिवाय ईशा गुप्ता, कुमूद मिश्रा, जरीना वहाब, जाकीर हुसैन, राजेश शर्मा आणि मुर्ली शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. अशोक नंदा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून केतन पटेल यांची निर्मिती आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. ‘प्रत्येक गुन्ह्यात एक कथा असते,’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. आता अनुपम खेर आणि ईशाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.