मुंबई- दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आगामी 'खामोशी' चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
प्रभूदेवाच्या 'खामोशी'ची रिलीज डेट बदलली, आता या दिवशी होणार प्रदर्शित - tamanna bhatiya
'खामोशी' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
येत्या ३१ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. याबद्दलची अधिकृत घोषणादेखील करण्यात आली होती. मात्र, आता ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाचं एक नवं पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
चक्री टॉलेटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा एक हॉरर चित्रपट असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी पोस्ट प्रोडक्शनचे काम बाकी असल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.