मुंबई- 'हसी तो फसी' या चित्रपटातील आपल्या जबरदस्त ऑनस्क्रीन केमिस्ट्रीनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची जोडी आणखी एका चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'जबरिया जोडी' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
सिद्धार्थ-परिणीतीच्या 'जबरिया जोडी'साठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतिक्षा - parineeti chopra
सिद्धार्थ-परिणीतीच्या 'जबरिया जोडी'ला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा चित्रपट १२ जुलैला चित्रपटगृहं गाजवण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र, आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
या 'जबरिया जोडी'ला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा चित्रपट १२ जुलैला चित्रपटगृहं गाजवण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र, आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता २ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्रानं आपल्या ट्विटर अकाऊंवरून ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. २०१८ च्या ऑगस्टमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. चित्रपटात सिद्धार्थ आणि परिणीतीशिवाय अपारशक्ती खुराणा, संजय मिश्रा, नीरज सूद, गोपाल दत्त, जावेद जाफरी आणि चंदन रॉय यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत.